चला फिरायला… पुण्यात साकारणार निसर्ग पर्यटन केंद्र

5 विविध ठिकाणी प्रकल्पाचे काम सुरू

पुणे – राज्यात निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध योजनांची घोषणा नुकतीच वनमंत्री संजय राठोड यांनी केली होती. त्याच अनुषंगाने पुण्यातदेखील वनविभागातर्फे पाच ठिकाणी निसर्ग पर्यटनासाठी विविध सोयी-सुविधांची उभारणी केली जात आहे. लवकरच या ठिकाणी नागरिकांना निसर्ग पर्यटनाचा अनुभव घेता येईल, असा विश्वास वनविभागाने वर्तविला आहे.

 

विभागातर्फे पुण्यात पाच ठिकाणी निसर्ग पर्यटन केंद्र विकसित केले जात आहेत. यामध्ये बावधन, तळेगाव, काळेपडळ, तळजाई -पाचगाव पर्वती, वारजे वनोद्यान यांचा समावेश आहे. विभागातर्फे याठिकाणी विविध कामे केली जात आहे.

 

यामध्ये प्रामुख्याने या भागांमधील “ग्लिरीसीडिया’ ही उपद्रवी वनस्पती काढून त्याऐवजी स्वदेशी प्रजातील उंच रोपांची लागवड करण्याचे काम करण्यात आले आहे. या व्यरितिरिक्त वनोद्यानांच्या भोवती संरक्षक भिंत उभारणे, निसर्ग पायवाट तयार करणे, वनतळी-तलावांची बांधणी, बांबू पागोडा उभारणे, नागरिकांसाठी लाकडी बाक तसेच माहिती केंद्रांची उभारणी यासारखी कामे देखील वनविभागातर्फे केली जात आहे.

 

या प्रत्येक उद्यानाचे स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य आहे. त्या ठिकाणी पर्यावरणपूरक सुविधांच्या उभारणीमुळे नागरिकांना निसर्ग पर्यटनाचा उत्तम अनुभव घेता येईल. तसेच या माध्यमातून नागरिक निसर्गाशी जोडले जातील, असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.