Asian Olympic qualifiers shooting : भारतीय नेमबाज वरुणसह ईशाने मिळवला पॅरिस ऑलिम्पिक कोटा…

जकार्ता :- भारताचा स्टार नेमबाज वरुण तोमर व अव्वल महिला नेमबाज ईशा सिंग यांनी आशियाई पात्रता फेरीत आपआपल्या गटात सुवर्णपदक पटकावले आणि भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिक कोटा मिळवला. वरुण याने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात व ईशा हिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले.
आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी पॅरिस ऑलिंपिकसाठी १५ कोटा मिळवले आहेत. टोकियो ऑलिंपिकमध्येही १५ ऑलिंपिक कोटा मिळवण्यात भारतीयांना यश मिळाले होते. यंदा भारताने त्याची बरोबरी केली असून नेमबाजांना नवा विक्रम प्रस्थापित करण्याची संधी आहे.
वरूण याने अंतिम फेरीत २३९.६ गुणांची कमाई करताना सुवर्णपदकावर नाव कोरले. भारताच्याच अर्जुन चीमा याने २३७.३ गुणांसह रजतपदकाची कमाई केली. मंगोलियाच्या दावाखू एंखतायवान याने २१७.२ गुणांची कमाई करीत ब्राँझपदक जिंकले.
Auckland Classic 2024 : कोको गॉफ सलग दुसऱ्यांदा ठरली चॅम्पियन…
याआधी वरुण (५८६ गुण), अर्जुन (५७९ गुण) व उज्ज्वल मलिक (५७५ गुण) यांनी १७४० गुणांची कमाई करताना १० मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. यंदाच्या वर्षी जुलैमध्ये होत असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी आतापर्यंत भारताचे १५ नेमबाज पात्र ठरले आहेत. जुलै-ऑगस्ट महिन्यांत पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी आणखी एक पात्रता फेरी होणार आहे. त्यामुळे भारताच्या आणखी काही खेळाडूंना ही पात्रता मिळवण्याची संधी आहे.





