बिहारमध्ये राष्ट्रीय लोक समता पार्टीला दणका

पाटणा – बिहारमध्ये माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक समता पार्टीला लोकसभेच्या निवडणूकीत मिळालेल्या अपयशानंतर आज आणखी एक दणका बसला. विधान परिषदेतील राष्ट्रीय लोक समता पार्टीचे सर्व 3 आमदार आज सत्ताधारी संयुक्‍त जनता दलामध्ये सामील झाले. विधान परिषदेचे अध्यक्ष विजय कुमार चौधरी आणि उपाध्यक्ष हरून रशिद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आरएलएसपीचे विधानसभेतील लालन पासवान आणि सुधांशू शेखर यांच्यासह विधान परिषदेतील आमदार संजीव सिंह शाम यांनी याबाबतची पत्रे संबंधित सभागृह सभापती आणि अध्यक्षांकडे पाठवली आहेत. त्यांच्या पत्रांना संयुक्‍त जनता दलाच्या मंजूरीची पत्रेही जोडली आहेत. या तिन्ही आमदारांना प्रत्यक्ष उपस्थित राहून औपचारिकता पूर्ण करण्याची सूचनाकरण्यात आली आहे. त्यामुळे हे तिघेही यापुढे संयुक्‍त जनता दलाचे आमदार असतील, असे चौधरी आणिरशिद यांनी सांगितले.

केंद्रातील “एनडीए’मधून फुटून निघण्याच्या निर्णयावर राष्ट्रीय लोक समता पार्टीचे आमदार पक्षाध्यक्ष कुशवाह यांच्यावर नाखुष होते. या आमदारांनी कुशवाह यांच्याविरोधात बंडही केले होते. सर्व तिन्ही आमदार संयुक्‍त जनता दलात सामील झाल्याने आता निवडणुक आयोगाकडून त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई होण्याची शक्‍यता नाही. आपल्या गटालाच मूळ”राष्ट्रीय लोक समता पार्टी’ची मान्यता मिळावी, अशी मागणी या आमदारांनी निवडणुक आयोगाकडे केली आहे.

राज्यसभेत संयुक्‍त जनता दलाकडून सदस्यत्व मिळालेल्या कुशवाह यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन स्वतंत्र पक्षाची स्थापना केली होती.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.