पंतप्रधानपदी मोदींचा शपथविधी गुरुवारी

नवी दिल्ली- नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी येत्या गुरुवारी (30 मे) रोजी होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात होणाऱ्या समारंभामध्ये मोदी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमवेत सलग दुसऱ्या वेळी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मोदी आणि अन्य केंद्रीय मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील, असे राष्ट्रपती भवनाच्या सचिवालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

प्रखर राष्ट्रवाद आणि तीव्र कॉंग्रेस विरोधाच्या बळावर मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 300 पेक्षा जास्त जागा जिंकून सर्वात मोठा पक्षाचा दर्जा मिळवला आणि सलग दुसऱ्यावेळेस केंद्रातील सरकार स्थापण्याचा दावा केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 282 जागा जिंकल्या होत्या. तर यंदाच्या निवडणुकीत भाजपने 303 जागांपर्यंत मजल मारली आहे.

माजी पंतप्रधान दिवंगत पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर इंदिरा गांधी यांनी 1971 साली पूर्ण बहुमतातील सरकार स्थापन केले होते. त्यानंतर यंदा पहिल्यांदाच कॉंग्रेस व्यतिरिक्‍त एखाद्या पक्षाने स्वतःच्या बळावर सलग दुसऱ्या वेळेस लोकसभेतील बहुमत मिळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)