पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या अमृमहोत्सवी (75 वर्षे) स्थापना वर्षा निमित्त विविध क्रीडा आणि साहसी उपक्रम हाती घेण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून 15 ऑक्टोबरला एनडीए मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीच्या माध्यमातून देशातील युवकांच्या भावना प्रज्वलित होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
शर्यतीत देशभरातून साधारण 12 हजार खेळाडू सहभागी होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शर्यतीत 42 कि.मी. पूर्ण मॅरेथॉन, 21 कि.मी. अर्ध मॅरेथॉन, 10 कि.मी, 5 कि.मी. आणि 3 कि.मी. धावणे अशा शर्यतींचा समावेश असणार आहे.
शर्यतीचे एनडीए परिसरातच आयोजन होणार असून, यामुळे स्पर्धकांसह उपस्थितांना एक अतुलनीय अनुभव घेता येईल. शिस्त आणि देशभक्तीच्या आदर्शांना ही शर्यत नक्कीच प्रोत्साहन देईन आणि अधिकाधिक तरुण सशस्त्र दलात सामील होण्यासाठी प्रेरित होतील, असेही आयोजकांना वाटते. ही शर्यत वेद निर्मिती रियालिटीने पुरस्कृत केली असून ब्ल्यू ब्रिगेड स्पोर्टस फाउंडेशन यांच्या वतीने या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.