वाशिंग्टन – नासा स्पेस एजन्सीकडून सोशलवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये भारतीय-अमेरिकन वंशाची असून तिने नाव प्रतिमा रॉय आहे.
ती सायन्सची विद्यार्थिनी आहे. सध्या तिचा हा फोटो सोशलवर व्हायरल होत या फोटोत तिच्या मागच्या बाजूला लॅपटॉप सोबत देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती यांच्या बऱ्याच मूर्ती आणि फोटो ठेवले होते. याच पार्श्वभूमीवर ती मुलगी आणि नासा सोशल मिडियावर युझर्सच्या निशाण्यावर आहेत.
Today’s the day: applications for fall NASA internships are due!
Are you ready? Visit @NASAInterns and apply at: https://t.co/s69uwyR1LJ pic.twitter.com/CVwFJGYbms
— NASA (@NASA) July 9, 2021
तिच्या या फोटोमुळे सोशलवर पुन्हा एकदा विज्ञान आणि धर्म यांच्यातील चर्चेला जिवंत केले आहे. नेटकऱ्यांनीकडून सध्या तिच्या या फोटोवर प्रश्न उपस्थिती केले आहे काहींनी तिला ट्रोल केले आहे तर काहींनी तिला पाठिंबा दिला आहे.
एक युजर्सने म्हंटले आहे की,’नासा सायन्सची खिल्ली उडवत आहे.’ असं म्हणत तिच्यावर टीका केली तर एकाने धर्माच्या नावावर कुणावर निशाणा साधणे योग्य नाही.’ असं म्हणत त्यांनी तिला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, नासाने ट्विटरवर काही फोटो पोस्ट केले आहेत. यांच्या सहाय्याने नासाने आपल्या इंटर्नशिप प्रोग्रामसंदर्भात आठवण करून दिली आणि इच्छुक विद्यार्थ्यांना अप्लाय करायला सांगितले आहे. नासाने शेअर केलेल्या तिच्या फोटोला आतापर्यंत १६ हजार लोकांनी लाईक केले आहे.