हिटलरच्या सोन्याच्या ट्रेनचा शोध सुरू

बर्लिन – गेल्या कित्येक वर्षापासून जर्मनीमधील संशोधक जर्मनीचा हुकुमशहा अडॉल्फ हिटलर यांच्या कथित सोन्याच्या ट्रेनचा शोध घेत असून काही दिवसांपूर्वी त्यांच्या या शोधामध्ये प्रगती झाल्याचे समोर येत आहे.

याबाबतची डेली स्टार या नियतकालिकाने दिली आहे पोलंड मधील पिओल कोपर यांनी आपल्या गोल्डन ट्रेन फाउंडेशन या संस्थेच्या मदतीने सोनार आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून नाझींच्या काफ़िल्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही ट्रक चा शोध घेतला आहे.

त्यामुळे हिटलरची सोन्याची ट्रेन शोधण्याचा प्रयत्ननाना यश मिळण्याची आशा वाढली आहे. जर्मनीतील जासका नावाच्या एका गावात एका सरोवरात डिसेंबर दोन हजार वीस मध्ये संशोधन सुरू असताना हे ट्रक सापडले स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नाझी सैनिक 1945 मध्ये या गावात आले होते.

आणि त्यांनी आपले ट्रक या सरोवरातील पाण्यात बुडवले अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे या सरोवरामध्ये संशोधन केले असता त्यांना सरोवरामध्ये काही लोखंडाचे नमुने असल्याचे संकेत मिळाले या संशोधनसाठी पुढाकार घेणारे कोपर गेल्या कित्येक वर्षापासून हीटलरच्या सोन्याच्या ट्रेनच्या शोधात आहेत.

एका गुप्त बोगद्यामध्ये ही ट्रेन लपवण्यात आली आहे असे बोलले जाते तसैनिकांनी पाण्यात बुडलेले ट्रक सापडले असल्याने कोपल याना लवकरच हिटलरच्या सोन्याच्या ट्रेनचा ही शोध लागण्याची आशा वाटत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.