Narayan Rane – मी 96 कुळी मराठा (96 clan Maratha) आहे, कुठलाच मराठा कुणबी दाखला (Kunbi certificates) घेणार नाही, असा पुनरुच्चार केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे. मराठा आणि कुणबी हे दोन वेगवेगळे आहेत, मी आयुष्यात कुठलाच कुणबी दाखला घेणार नाही, असेही ते म्हणाले. त्यामुळे मराठा समाजातील अंतर्गत द्वंद आगामी काळात समोर येण्याची चिन्हे दिसून येत आहे.
इस्त्रायल-हमास युद्धात भारताची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केली. त्यावरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जोरदार टीका केली. त्याच टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज प्रत्युत्तर दिले.
राणे म्हणाले की, तुष्टीकरणाचे राजकारण सोडून, देश प्रथम ही भूमिका शरद पवार कधी तरी घेणार आहेत की नाही? 1993 मधील मुंबईतील साखळी बॉम्फस्फोटात ज्या पद्धतीने पवारांनी 13 वा बॉम्फस्फोट मशिदीत झाला अशी खोटी माहिती पसरवली त्यातून ते आतंकवाद्यांची बाजू घेऊ इच्छित होते का? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला.
पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणे अत्यंत चुकीचे आहेत. मुळात त्या ठिकाणी बॉम्बहल्ला झालाच नव्हता, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. पॅलेस्टाईनच्या विरोधात नरेंद्र मोदी यांनी भूमिका घेतली नाही.
तर त्यांनी दहशतवादा विरुद्ध भूमिका घेतली व मांडली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. देशात काय चालले, देशाचा विकास चांगला होत आहे, त्यावर ते कधीतरी बोलणार आहेत की नाही, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
शरद पवारांना मोदी विरोधाची कावीळ
हमासचे कौतुक करणाऱ्या शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात चांगले काम केलेले दिसत नाही का असा थेट सवालही राणेंनी यांनी विचारला.
शरद पवार हे काही लोकांना वाचवण्यासाठी ना देशाच्या हिताचे बोलतात ना समाजाच्या हिताचे अशी टीकाही त्यांनी केली. शरद पवारांना मोदी विरोधाची काविळ झाल्याने त्यांनी केलेली चांगली काम त्यांना दिसत नाहीत असे नारायण राणे म्हणाले.