मुंबई ( Narayan Rane arrest ) – नारायण राणे ( narayan rane statement on cm thackeray ) यांच्या मुख्यमंत्र्यांवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये एकाच खळबळ उडाली आहे. शिवसैनिकांनी राणेंच्या वक्तव्याबाबत रस्त्यावर उतरून तीव्र संताप व्यक्त केला आहे. काही ठिकाणी भाजप व शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे देखील पाहायला मिळाले.
दरम्यान, राणे यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांना अटक ( narayan rane arrest ) करण्यात आले असून त्यांना संगमेश्वर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. तत्पूर्वी, राणे यांना अटक करण्यासाठी सोमवारी रात्री उशिरा नाशिक पोलिसांचं एक पथक रवाना झालं होत.
अशातच, राणे यांच्या वक्तव्याचा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( sharad pawar on narayan rane ) यांना याबाबत विचारले असता त्यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.
“मला काही बोलायचं नाही. मी त्याला फारसं महत्व देत नाही. त्यांच्या पद्धतीने त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलतात.” असं पवार म्हणाले.