पुणे – करोना संशयित म्हणून नायडू रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी दाखल सर्व 11 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, दिवसभरात एकही संशयित रुग्ण दाखल झाला नसून, आतापर्यंत दाखल 72 व्यक्तींपैकी 71 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
तर 1 व्यक्ती विलगीकरण कक्षात दाखल असून, त्याचे नमुने निगेटिव्ह आल्याची माहिती सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली. दरम्यान, सध्या मुंबई येथे 4, तर पुणे येथे 1 व्यक्ती विलगीकरण कक्षात आहे.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार चीनमधून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला 14 दिवसांकरिता विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते. प्रवाशांना किरकोळ लक्षणे आढळल्यास विलगीकरण कक्षात दाखल व्हावे, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.