नेवासा- दिल्ली सुप्रीम कोर्ट ॲड.ऑन रेकॉर्ड झालेल्या परीक्षेत सागर पाहुणे पाटील यांनी टॉप पंधरामध्ये उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला आहे.
या यशाबद्दल सागर पाहुणे पाटील यांचा नेवासा येथे झालेल्या एका कार्यक्रमात गौरव करण्यात येऊन भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
मूळचे गंगापूर येथील रहिवासी असलेले सागर पाहुणे पाटील यांचा नेवासा येथे मोठा मित्र परिवाराचा गोतावळा आहे. दिल्ली सुप्रीम कोर्टच्या ऑन रेकॉर्डसारख्या अवघड परीक्षेत सागर – पाटील यांनी यश संपादन केल्याबद्दल त्यांचे पेढा भरवून व फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले.
सागर पाहुणे पाटील हे आमदार शंकरराव गडाख यांचे नेवासा येथील स्विय सहाय्यक सुनील जाधव यांचे बंधू आहेत. माजी जलसंधारण मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्यासह आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले.