ऍडलेड – ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला सलामीच्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या तीन सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्याच लढतीत भारतीय संघाला 4-2 असा पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या कॉर्टरमध्ये गोलशून्य बरोबरी झाल्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाने भारतावर सहा मिनिटांत दोन गोल केले.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या ऐस्लिंग उत्री हिने 21 व्या, तर मॅडी फित्झपॅट्रिकने 27 व्या मिनिटाला गोल केला. तिसऱ्या कॉर्टरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या अलिस अर्नाट (32) आणि कोर्टनी स्कोनेल (35) यांनी गोल केले. भारताकडून संगीता कुमारीने 29 व्या, तर शर्मिला देवीने 40 व्या मिनिटाला गोल केले. मालिकेतील दुसरा सामना याच मैदानावर आज (शनिवार) होणार आहे.