नवी दिल्ली – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी सोमवारी ट्विटर विकत घेतले. हा करार ४४ अब्ज डॉलर म्हणजेच ३.३७ लाख कोटी रुपयांमध्ये झाला आहे. ‘मस्क-ट्विटर करार’ हा टेक जगतातील आतापर्यंतचा तिसरा सर्वात मोठा करार आहे.
यापूर्वी, अलीकडेच, मायक्रोसॉफ्टने कँडी क्रश गेम निर्मात्या ऍक्टीव्हिजन ब्लिझार्डसोबत गेमिंग क्षेत्रातील सर्वात मोठा करार केला आहे. दरम्यान, यानंतर एलॉन मस्क कोका-कोला कंपनी विकत घेण्याचे संकेत दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केले आहे.
एलॉन मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, पुढील वेळीस मी ‘कोका-कोला’ कंपनी खरेदी करणार आहे. अमेरिकेतील प्रख्यात उद्योगपती एशा ग्रिग्स कँडलर यांनी १८८८ मध्ये कोका-कोला करण्याची प्रक्रिया एका केमिस्टकडून विकत घेतली होती.
यानंतर काही वर्षांमध्ये कोका-कोला कंपनीही जगातील मोठी उलाढाल असणारी कंपनी बनली. आता मस्क यांनी ही कंपनी विकत घेण्याचे संकेत देणारे ट्विट केले. याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. सध्या त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Next I’m buying Coca-Cola to put the cocaine back in
— Elon Musk (@elonmusk) April 28, 2022
अशा प्रकारे एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतले
मस्क आणि ट्विटरमधील डीलबद्दल बोलायचे झाले तर, अल्पावधीतच एलॉन मस्क शेअरहोल्डरपासून ट्विटरचा मालक बनले आहेत. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी सर्वप्रथम ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्ममध्ये ९.२ टक्के हिस्सा विकत घेतला आणि काही दिवसांनी त्यांनी ट्विटर बोर्डाला पत्र लिहून कंपनीला १०० टक्के खरेदी करण्याची मोठी ऑफर देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.
एलॉन मस्क यांनी ट्विटर ४३ अब्ज डॉलरमध्ये (३.२ लाख कोटी) विकत घेण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर सोमवारी उशिरा ४४ अब्ज डॉलरमध्ये (३.३७ लाख कोटी) करार पूर्ण झाला. मस्कच्या ऑफरनुसार, त्यांना ट्विटरच्या प्रत्येक शेअरसाठी ५४.२० डॉलर (रु. ४१४८) द्यावे लागतील.