तळेगाव दाभाडे – मजुरीच्या पैशांवरून झालेल्या वादातून सासऱ्याने जावयाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला. ही घटना आज गुरुवारी (दि. 20) दुपारी 3 वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे मारुती चौकाजवळ घडली.
सुनील रामचंद्र जाधव असे खून झालेल्या जावयाचे नाव आहे. याप्रकरणी दत्तू बाळू मोहिते याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयत सुनील आणि आरोपी दत्तू हे नात्याने जावई व सासरे आहेत.
दोघांमध्ये मजुरीचे पैसे कमी दिल्याच्या कारणावरून वाद झाला. त्यातच दत्तू याने आपल्या जावयावर कुऱ्हाडीने घाव घालून जखमी केले. जखमी सुनील यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सुनील यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी सासरा दत्तू याला ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.