सांगली – म्हशीच्या आर्थिक वादातून एकाचा रात्री धारदार शस्त्राने भोकसून खून केल्याची घटना सांगलीतील जत येथे घडली आहे. आर्थिक देवाण – घेवाणीतून हा खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसराक खळबऴ उडाली आहे.
बंदेनमाज उर्फ बंडा मकदूम शेख वय ४० खून करण्यात आलेल्याचे नाव असून संतोष हारणे वय २१ असे संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी जतमधील हिवरे येथून त्यास अटक केली आहे. फिर्याद मुन्ना मकदुम शेख यांनी पोलिसात तक्रार दोखल केली आहे.
बंदेनमाज यांचा जनावरे खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. काही दिवसांपूर्वी संतोष हारणे याला चाळीस हजार किंमतीची म्हशीची विक्री केली होती.मात्र मशीला गंभीर आजार असल्याने ती परत शेख यांस परत दिली होती. व पैसे परत घेण्यास विनंती केली. संतोषने व्यवहारातील पैसे परत करण्यासाठी शेख यांच्याकडे तगादा लावला होता. यातून दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता.
शेख यांनी संतोष यास तीस हजार रुपये देऊन वाद मिटवला मात्र, लगेचच सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शेख यांस कॅटल फार्म येथे संतोषने बोलवून नेले होते. व याठिकाणी संतोषने शस्त्राने शेख याचा खून केला.