पुणे –चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी पतीवर सिंहगड रोड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अजय निकाळजे (वय 22, रा. सिंहगड रोड, धायरी फाटा) असे आरोपीचे नाव असून, तो सध्या फरार आहे. विशेष म्हणजे, या दोघांचा अवघ्या चार महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. ही घटना दि.20 रोजी उघडकीस आली होती.
दिशा निकाळजे (वय 19) हिचा मृतदेह राहत्या घरी आढळून आला होता. तिच्या गळ्यावरील व्रण पाहता घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यानुसार त्यांनी तपासाला सुरुवात केली होती. दिशा आणि अजय दोघेही जनता वसाहत परिसरात राहत होते. विवाहानंतर ते धायरी येथे वास्तव्यास आले होते. शुक्रवारी सायंकाळी अजयची बहीण घरी आली. त्यावेळी तिला निशा बेशुद्धावस्थेत दिसून आली. तिने हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर अजयच्या आईने तत्काळ दिशाला रुग्णालयात नेले.