fbpx

सोमवारी महापालिकेची कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु होण्याची शक्‍यता

  • पालिकेतील कार्यालये अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्षेत
  • दिवाळीच्या सुट्ट्या आठवडाभर लांबल्या

पिंपरी – दिवाळीनिमित्ताने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सलग सुट्ट्या घेतल्या आहेत. अधिकारी व कर्मचारी गैरहजर असल्याने महापालिका भवनासह 8 क्षेत्रीय कार्यालयात नगरसेवकांसह नागरिकांची संख्या कमी झाली. त्यामुळे पालिकेच्या सर्वच कार्यालयात शुकशुकाट जाणवत आहे. दिवाळीचा सणानिमित्त अधिकारी व कर्मचारी बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे पालिकेतील कार्यालये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्षेत आहेत. सोमवारी पालिकेची कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु होण्याची शक्‍यता आहे.

दिवाळी सणासाठी महापालिकेला शुक्रवार (दि. 13) पासून चार दिवस सुट्टी होती. त्यामध्ये शनिवार व रविवारची ही भर असल्याने यंदा जोडून सुट्या आल्या होत्या. त्यानंतर काही अधिकाऱ्यांनी आणखी काही दिवस सुट्ट्या घेतल्या आहेत. सलग चार दिवस सुट्टी व त्यानंतर आठवडाभर रजा टाकून बहुतांश जण आपल्या गावी किंवा सहलीचे नियोजन करून फिरायला गेले आहेत. अधिकारी व कर्मचारी नसल्याने अधिकाऱ्यांसह नागरिकही येत नाहीत. त्यामुळे पालिकेमध्ये शुकशुकाट जाणवत आहे.

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांनीही दिवाळीच्या सुट्टीला जोडून सुट्ट्या घेतल्या आहेत. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयातील वर्दळही कमी झाली आहे. अधिकारी व कर्मचारी नसल्याने नागरिकांचीही कामे रखडली आहेत. मंगळवारी (दि. 16) पालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळीची सुट्टी संपली आहे. त्यानंतर त्यांनी पुढे सलग सुट्ट्या घेतल्यामुळे बहुतांश कार्यालयामध्ये शुकशुकाट आहे.

येत्या सोमवारपासून अधिकारी व कर्मचारी पालिकेत उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर पालिकेमध्ये नगरसेवक व नागरिकांची वर्दळ वाढेल. मात्र सद्यस्थितीत पालिकेमध्ये नागरिक व नगरसेवकांची संख्या रोडावली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.