प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 2 -स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान “हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे महापालिकेने 5 लाख झेंडे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील आठवड्यात स्थायी समितीत या झेंडे खरेदीसाठी 1 कोटी 25 लाख रुपयांच्या वर्गीकरणास मान्यता देण्यात आली होती.
या मान्यतेच्या प्रस्तावात हे झेंडे महापालिकेने खरेदी करून नंतर ते क्षेत्रीय कार्यालयस्तराव विक्री करण्याचे नियोजन होते. मात्र, तो निर्णय आता बदलण्यात आला असून गुरूवारपासून पालिकेस झेंडे पालिकेस उपलब्ध होणार आहेत. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर शहरात तब्बल 300 केंद्रावर हे झेंडे नागरिकांना मोफत वाटप केले जाणार आहेत. देशभक्तीची भावना जागृत व्हावी यासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यामध्ये नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्टदरम्यान घरावर तिरंगा झेंडा लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हापालिका 5 लाख झेंडे खरेदी करत आहे. ते घरोघरी मोफत वाटप करावेत अशा सूचना आहेत. तसेच 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सुमारे 300 ठिकाणी वाटप केंद्र करण्यात येणार आहे.
– सचिन इथापे,
सामान्य प्रशासन विभाग