आबूधाबी -आयपीएल स्पर्धेत सुरुवातीला ढेपाळणारा व नंतर आश्चर्यकारक प्रगती करणारा संघ ही ओळख रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईने याही स्पर्धेत जपली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध सरस कामगिरी करण्याचे कठीण आव्हान राजस्थान रॉयल्सला पेलावे लागणार आहे.
आज या दोन संघात होणारी लढत राजस्थानला प्रतिष्ठा जपण्यासाठी महत्त्वाची आहे. दोन्ही संघांचे बलाबल पाहता मुंबईचे पारडे जड राहणार असून त्यांच्या पॉवर हिटर्सला कसे रोखायचे हा प्रश्न राजस्थानसमोर निर्माण झाला आहे.
राजस्थानबाबत बोलायचे झाले तर कर्णधार स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन, राहुल तेवतिया असे आक्रमक फलंदाज त्यांच्या संघात असले तरीही त्यांना यंदाच्या स्पर्धेत फारशी सरस कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्यांना प्ले-ऑफ गाठण्याची संधीही आता मिळणार नाही.
सामन्याची वेळ (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
सायंकाळी : 7 ः30
ठिकाण ः आबूधाबी
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्टसवर