मुंबईने माणुसकी गमावली वाटतं

सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणावर मुंबई संदर्भात केलं ट्विट

मुंबई –  हिंदी चित्रपटसृष्टीत अल्पावधीत गुणवत्तेच्या जोरावर लोकप्रियता मिळवूनही आत्महत्या करून जीवन संपवलेल्या सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यू  प्रकरणाची चौकशी सुरूच असून या विषयाला आता राजकारणानेही वेढा घातला आहे.

सुशांत सिंगची जन्मभूमी असलेले बिहार राज्य आणि त्याची कर्मभूमी असलेली मुंबई म्हणजे महाराष्ट्र राज्य या दोन राज्यांच्या पोलिसांमध्ये आता संघर्ष निर्माण झाला असून त्यामुळे आपोआपच दोन्ही राज्यातील राजकारणी नेते सक्रिय झाले आहेत.

याच संदर्भात आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

“सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी #JusticeforSushantSingRajput आणि #JusticeForDishaSalian हे दोन हॅशटॅगही ट्विट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.