मुंबई – देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रामध्ये असून मुंबई शहर सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनलंय. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रसारास अटकाव करण्यासाठी शासनातर्फे युद्धपातळीवर उपाययोजना राबवण्यात येतायेत. अशातच लॉक डाऊनच्या नियमांचे नागरिकांकडून उल्लंघन होऊ यासाठी दिवस-रात्र एक करणाऱ्या पोलिसांना देखील कोरोना लक्ष्य करतोय. मुंबईमध्ये पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले असून आतापर्यंत दोन पोलिसांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. कोरोनाच्या बाधेपासून पोलिसांना दूर ठेवण्यासाठी ५२ वर्षांवरील मुंबई पोलिसांसाठी नवीन नियम लागू करण्यात आलेत.
याबाबतची माहिती मुंबई पोलिसांच्या प्रसिद्धी विभागातर्फे देण्यात आली असून यापुढे ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आलेत. याव्यतिरिक्त ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचे वय ५२ वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक असून त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी व्याधी असतील तर अशा पोलीस कर्मचाऱ्यांनाही घरीच थांबण्याचे आदेश दिले गेलेत.
All personnel above 55 years of age have been asked to stay at home, all personnel above 52 years of age with previous medical conditions like Diabetes, Hypertension etc. have also been asked to stay at home: Public Relation Officer (PRO) of Mumbai Police #Maharashtra
— ANI (@ANI) April 28, 2020