मुंबई : डिंपल कपाडिया यांच्या आईचे निधन

मुंबई – बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री बेटी कपाडिया यांचे आज पहाटे 4 च्या सुमारास मुंबईतील एका रूग्णालयात निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या रूग्णालयात भरती होत्या. त्यांच्या निधनानंतर त्यांची नात ट्विंकल खन्ना व अक्षय कुमार दोघेही रूग्णालयाबाहेर दिसले.

काही दिवसांपूर्वी ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार हिंदुजा हॉस्पिटलबाहेर दिसले होती आणि त्यावरून डिंपल कपाडिया रूग्णालयात भरती असल्याची चर्चा पसरली होती. मात्र याबाबत  डिंपल यांची प्रकृती खराब असल्याची बातमी येताच, चाहते अस्वस्थ झाले होते. पण काहीच तासांत डिंपल रूग्णालयात भरती असल्याची बातमी अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते. खुद्द डिंपल यांनी तसा खुलासा केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.