मुंबई – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना उत्तर मुंबई सत्र न्यायालयाने दिलेला दिलासा कायम ठेवला आहे. मुंबै बॅंक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये देरकरांनी मजूर म्हणून निवडणूक लढवली होती. फसवणूक करुन निवडणूक लढवली असल्याचा आरोप त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामुळे दरेकरांवर अटकेची टांगती तलवार असल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. दरेकरांना सत्र न्यायायलायने 21 मार्चपर्यंत दिलासा दिला होता. आज मुदत संपत आल्यामुळे पुन्हा सुनावणी करण्यात आली तेव्हा न्यायालयाने बुधवारपर्यंत दिलासा कायम ठेवण्यात आला आहे.
मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मुंबै बॅंकेची शाखा येते. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दरेकरांनी मजूर म्हणून निवडणूक लढवली होती.
प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. हायकोर्टात अर्ज फेटाळण्यात आला होता. यानंतर दरेकरांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका केली होती. सत्र न्यायालयाने दरेकरांना 21 मार्च रोजीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते.
मुदतीचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे पुन्हा सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने बुधवापरर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. सत्र न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज राज्य सरकारने कोर्टात आपली भूमिका मांडली.