पिरंगुट- मुळशी तालुक्यात शुक्रवारी 17 रुग्ण आढळून आले. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 294 झाली आहे. मुळशी तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या त्रिशतक पार करणार आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सूसमध्ये आठ, भूगावमध्ये चार, भुकूममध्ये एक, बावधनमध्ये एक, पौडमध्ये एक, उरवडेमध्ये एक आणि मुळशी खुर्दमध्ये एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 294 झाली आहे.
सध्या रुग्णालयात 175 रुग्ण उपचार घेत आहेत तर 111 रुग्णांना घरी सोडण्यात आलेले आहे. आज 12 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तीन रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. तालुक्यात आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे तालुक्यातील मृतांची संख्या आठ झाली आहे.