मुंबई -चेन्नई सुपर किंग्जचा विजयी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या गुडघ्यावर येथील एका खासगी रुग्णालयात नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
मुंबईतील प्रख्यात कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया डॉ. दिनशॉ परडीवाला यांनी केली असून ती यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत एका कार अपघातात जखमी झाला होता, त्याच्यावरही याच डॉ. परडीवाला यांनी शस्त्रक्रिया केली होती. धोनीला आता पुढील काही दिवस पूर्ण विश्रांती घ्यावी लागणार आहे.