Entertainment : मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने (Mrunmayee deshpande) अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक ऐतिहासिक चित्रपटांमध्ये देखील दमदार भूमिकेत पाहायला मिळाली होती. याशिवाय मृण्मयी सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या फोटोंना चाहत्यांची देखील चांगली पसंती मिळते. नुकतेच मृण्मयीने पतीसोबतचा एक रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. मात्र यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.
मृण्मयी बऱ्याचदा सोशल मीडियावर तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या या फोटोंना नेटकरी पसंतीही देतात. परंतु, यावेळी तिने शेअर केलेल्या फोटोमुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलं सुनावलं आहे. इतकंच नाही तर तिला संस्कृती जपण्याचे सल्लेही दिले आहेत.
नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंट करत लिहिले की, ‘ही आपली संस्कृती नाही,’ ‘आपल्या बायकांनी असे केलेलं शोभत नाही. तुम्ही सगळे परदेशी विचारधारणामुळे बिघडत चालले आहात,’ ‘तुम्हाला संस्कार नाहीत’, ‘हे तुझे एकांतातले क्षण,दुसर्यांना दाखवण्यासाठी नसतात. तु साधी मुलगी आहेस अशी वागू नको’, असे म्हणत अनेकांनी तिच्यावर ताशेरे ओढले आहेत.
मृण्मयीने हा फोटो शेअर केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी तिच्यावरकौतुकाचा वर्षाव केला आहे. मात्र, तिचे चाहते नाराज झाले आहेत. यापूर्वी सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी आणि मिताली मयेकर ह्यांना देखील त्यांच्या बोल्ड फोटोशूटवरून ट्रोल करण्यात आले होते.
दरम्यान, नाटकांमधून आपल्या अभिनयाला सुरुवात केलेली मृण्मयी कुंकू, अग्निहोत्र अशा मालिकांमधून घराघरात पोहचली. ‘नटसम्राट’ स्लॅमबूक अशा दमदार चित्रपटांमध्ये काम करून तिने सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख बनवली आहे. यानंतर मृण्मयीने ‘सुभेदार’ ‘शेर शिवराज’, ‘फर्जंद’ आणि फत्तेशिकस्त’ या चित्रपटात अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे.