मुंबई – ‘खणाची साडी’ही महाराष्ट्रीय परंपरेचा अविभाज्य भाग आहे. अनेक उत्सवांना या प्रकारची साडी आवर्जून नेसली जाते. आता तरुण मुलींना टिपिकल साडीपेक्षा काहीतरी वेगळं हवं असतं.
दरम्यान, या खणांच्या साड्या आता एका वेगळ्या ढंगात आणि आकर्षक लूक मध्ये पाहायला मिळत आहेत. खास डिझाइन केलेल्या या साड्यांना मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनी सुद्धा चांगलीच पसंती दिल्याचं दिसून येत आहे.
या खास आणि नवीन लूक मधील साड्यांचे अभिनेत्रींचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.