Hollywood – अभिनेत्री अँजेलिना जोलीने हॉलिवूड आणि लॉस एंजेलिस संदर्भात वक्तव्य करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. अभिनेत्रीने अलीकडेच खुलासा केला की ती,’लॉस एंजेलिस (एलए) मधून बाहेर पडण्याचा विचार करत आहे. अँजेलिनाने सांगितले की, योग्य वेळ आल्यावर तिला कंबोडियात स्थलातरित होण्याची आशा आहे. तिने कबूल केले की एलए सोडण्याचा विचार करत असलेल्या कारणांपैकी एक कारण म्हणजे ब्रॅडसोबतचा तिचा घटस्फोट आणि कायदेशीर प्रक्रियेत कुटुंबाचा सहभाग आहे’
यादरम्यान, अँजेलिना हॉलिवूडबद्दलचे तिचे मत मांडत होती. तसेच तिने भविष्यातील योजना सांगितल्या. ती पुढे म्हणाली, “मी आज अभिनेत्री होणार नाही. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मला इतकी सार्वजनिक, इतकं शेअर करण्याची अपेक्षा नव्हती. मी हॉलिवूडच्या आसपास लहानाची मोठी झाल्यामुळे, माझ्यावर त्याचा फारसा प्रभाव पडला नाही.”
एलए सोडण्याबद्दल, अँजेलिना म्हणाली, “माझ्या घटस्फोटानंतर जे घडले त्याचा हा एक भाग आहे. मी जगण्याची आणि स्वतंत्रपणे प्रवास करण्याची क्षमता गमावली आहे. जेव्हा “मी कदाचित जाईन. हॉलीवूड हे जगातील सर्व ठिकाणांपेक्षा निरोगी ठिकाण नाही. ” एंजेलिनाने असेही सांगितले की, तिला सामाजिक जीवन नाही. अभिनेत्रीने देखील पुष्टी केली की ती सध्या कोणासही डेट करत नाहीये. आपली मुले आपले मित्र असल्याचेही तिने सांगितले.