मुंबई : राज्यात शिंदे गटातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन वाटप घोटाळ्याचा आरोप केला जात असतानाच दुसरीकडे आणखी एक मंत्री वादात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये भुसे तरुणांना मारहाण करताना दिसून येत आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ, एका हिरकणी कक्षांमधील असून या व्हिडीओत मंत्री दादा भुसे दोन तरुणांना शिवीगाळ करत मारहाण करताना दिसून येत आहे. व्हिडीओ पोस्ट करताना जितेंद्र आव्हाड यांनी दादा भुसे यांच्यावर कारवाई कधी होणार? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.
मंत्री दादा भूसे फटकावतात .
शिव्या देतात
मुख्यमंत्री साहेब
कुठला गुन्हा पोलिस घेणार
पोलिसां समोर मारले
माझा नग्न फोटो fb वर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलत #सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौझ उभी केलीत supreme court मध्ये
रात्री त्या विकृत बरोबर आपली बैठक
आता बोला .. pic.twitter.com/EGsJmvApfI— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 26, 2022
ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत जितेंद्र आव्हाड यांनी, ‘पोलिसांसमोर एखाद्या व्यक्तीला मारहाण करण्यात येत आहे, कायदा सुव्यवस्थेचं काय? मंत्री दादा भूसे फटकावतात. शिव्या देतात, मुख्यमंत्री साहेब… कुठला गुन्हा पोलिस घेणार… पोलिसांसमोर मारले.. माझा नग्न फोटो फेसबुकवर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलत. सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौज उभी केलीत. सुप्रीम कोर्टामध्ये रात्री त्या विकृत बरोबर आपली बैठक झाली… आता बोला’, असा सवालही केला आहे.
दरम्यान, व्हिडीओत मंत्री दादा भुसे या तरुणांना शिवीगाळ करत मारहाण करताना दिसून येत आहे. या तरुणांची नेमकी चूक काय होती? कोणत्या कारणासाठी दादा भुसे तरुणांना मारहाण करत आहेत? हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे? याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा सुरु आहे. यावर सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर देण्यात येतं ? विरोधक याबाबत हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार का? हे लवकरच समजेल.