सासवड – खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी (दि. 28) पुरंदर दौऱ्यावर आहेत. यावेळी विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ खासदार सुळे व आमदार संजय जगताप यांच्या हस्ते होणार आहेत. सकाळी 10 वाजता चांबळी- कोडीत नारायणपूर रस्ता, सासवड पालखीतळ, पश्चिम तारादत्त पार्क आप्पासाहेब लांडगे सभागृहाचे व अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन, सासवड येथील आचार्य अत्रे नाट्यगृहाचे नूतनीकरण,
तहसीलदार निवास सोनेरी रस्ता, वाघपूर चौफुला वाघापूर चौफुला ते गुऱ्होळी गाव रस्ता, पारगाव-पिसर्वे रस्ता येथील रेल्वे लाइन क्रोसिंग ब्रिजची पाहणी, सुपे गावठाण जवळचा रस्ता भूमिपूजन, कोडीत-गराडे रस्ता, गराडे नवीन मंजूर शिवभोजन थाळीचे उद्घाटन समारंभ होणार आहेत.