पुणे-शहरात मागील तीन दिवसांत नवीन आढळणाऱ्या करोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, मागील चोवीस तासांत 7 हजार 410 रुग्ण करोनामुक्त झाले असून, नवीन 4 हजार 136 रुग्ण आढळले आहेत. तर, पुण्यातील 5 रुग्णांसह 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
शहरात 41 हजार 173 सक्रिय बाधित आहेत. यापैकी 41 रुग्ण गंभीर असून, त्यांना व्हेटींलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर, 368 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. मागील चोवीस तासांत 12 हजार 816 संशयितांची टेस्ट करण्यात आली आहे. शहरात आतापर्यंत 6 लाख 24 हजार 684 करोनाबाधित आढळले असून, त्यापैकी 5 लाख 74 हजार 297 रुग्ण बरे झाले आहेत. तर 9 हजार 214 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पाच जणांचा मृत्यू
बुधवारी 26 जानेवारीला पुणे शहरात 5 हजार 521 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, 6 हजार 333 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यातील 3 रुग्णांसह उपचारादरम्यान 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.