“या’ राज्यात सर्वाधिक महिला करतात मद्यपान

तंबाखूच्या सेवनात ईशान्येकडील राज्यं टॉपवर

नवी दिल्ली – नेहमी असेच मानले जाते की स्त्रीयांपेक्षा पुरुष जास्त मद्यपान करतात. मद्यपानाचा विषय निघाला की गोवा राज्याचाही हमखास उल्लेख होतो. मात्र, अशा पारंपरिक समजांना धक्का देणारी आकडेवारी समोर आली आहे. सर्वाधिक पुरुष मद्यपान करतात ते राज्य आहे कर्नाटक आणि ज्या राज्यात सर्वाधिक स्त्रिया मद्यपान करतात, ते राज्य आहे सिक्कीम!

बिहारमधील तळीरामांची संख्या पाहून तुम्हाला धक्का बसेल, बिहारमध्ये भलेही दारूबंदी असली राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-20 ची आकडेवारी समोर आली आहे. मद्यपान करण्याच्या बाबतीत तेलंगणा गोव्यापेक्षा पुढे आहे तर तंबाखूच्या सेवनात ईशान्येकडील राज्यं टॉपवर आहेत.

या सर्वेक्षणानुसार दारू पिण्याच्या बाबतीत महाराष्ट्रातील पुरुष देशात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कर्नाटकमधील पुरुष सर्वाधिक मद्यपान करतात. दारूबंदी असलेल्या गुजरात आणि जम्मू-काश्‍मीरमधील सर्वात कमी पुरुष मद्यपान करतात. वर्ष 2019-20 च्या सर्वेक्षणात 15-49 वयोगटातील लोकांचे सर्वेक्षण केले गेले, तर नवीन सर्वेक्षणात 15 वर्षांवरील सर्व वयोगटाच्या लोकांचा समावेश आहे.
महिलांच्या मद्यपानामध्ये ईशान्येकडील सिक्कीम राज्यातील महिला 16.2 टक्के आकडेवारीसह अव्वल आहे, तर आसाममधील 7.3 टक्के महिला मद्यपान करतात आणि हे राज्य दुस-या क्रमांकावर आहे. मद्य सेवनाच्या बाबतीत तेलंगणाचे पुरुष पहिल्या क्रमांकावर आहेत, तर महिलाही मागे नाहीत. त्यादेखील देशात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या सर्वेक्षणानुसार गोवा आणि तेलंगण वगळता ईशान्येकडील महिला सर्वाधिक मद्यपान करतात.

शहरी महिलांपेक्षा खेड्यांमधील स्त्रिया तुलनेने जास्त दारू पितात. देशातील ब4याच भागात हीच परिस्थिती आहे. गावातील स्त्रिया “मी मद्यपान करते’ सांगण्यात अजिबात संकोच करत नाहीत. तर शहरी महिलांना याबद्दल सांगताना थोडासा संकोच करतात. शहरी आणि ग्रामीण पुरुष मद्यपान करतात परंतु महिलांइतके त्यांच्यात अंतर नाही.

ईशान्येकडील मिझोरम राज्यात 77.8 टक्के पुरुष तंबाखूचे सेवन करतात तर 65 टक्के स्त्रियांनाही तंबाखूचं व्यसन आहे. दक्षिणेकडील केरळ राज्यात तंबाखूचा सर्वात कमी वापर होतो, जेथे केवळ 17 टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात. 18 टक्के पुरुष गोव्यात तंबाखू खातात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.