व्हायग्रासारख्या दहा गोळ्या एकदम खाल्या; युवकाचा मृत्यु

अपघात की आत्महत्त्या; गूढ वाढले

भोपाळ – कोणत्याही रोगावरचे औषध हे नेहमी दुधारी तलवारीसारखे शस्त्र असल्याचे मानले जाते. योग्य प्रमाणात डॉक्‍टरी सल्ल्याने घेतलेले औषधोपचार रुग्णाला बरे करतो; मात्र अविचाराने घेतलेला ओव्हरडोस प्राणघातक ठरतो. कोणत्याही औषधाच्या ठरवून दिलेल्या डोसपेक्षा दुप्पट डोसला डबल डोस, पाचपट घेतलेल्या डोसला लोडींग डोस तर दहापट घेतलेल्या डोसला लेदल डोस अर्थात जीवघेणा डोस औषधशास्त्रानुसार मानले जाते.

भोपाळमध्ये अशीच एक दुर्धर घटना घडली आहे. व्हायग्रा अर्थात लैंगिक उत्तेजना वाढवणाऱ्या गोळयांच्या ओव्हरडोसमुळे (व्हायग्रासदृश) एका युवकाचा मृत्यू झाला आहे. पंचवीशीतील या युवकाने एकाचवेळी 10 गोळया खाल्ल्या. गोळया घेतल्यानंतर त्याला लगेच त्रास सुरु झाला. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत तरुण अविवाहित होता. तो एका खासगी कंपनीत नोकरीला होता. सात डिसेंबला या युवकाने लैंगिक उत्तेजना वाढवणाऱ्या गोळया खाल्ल्या.

प्राथमिक तपासातून ही आत्महत्या असल्याचे समोर आले आहे. मृत तरुणाने कुठलीही चिठ्ठी मागे सोडलेली नाही. त्यामुळे इतके टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण काय? ते अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यानंतर लगेच त्याची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली. अस्वस्थतात, चक्कर, उलटी, पोटात दुखणे असे त्रास त्याला सुरु झाले. तरुण जवळच्या डॉक्‍टरकडे गेला. त्याने काही औषधे दिली. पण तरुणाची प्रकृती ढासळतच होती.

कुटुंबीय त्याला दुसऱ्या डॉक्‍टरकडे घेऊन गेले. पण श्वसनाचा त्रास बळावल्यानंतर त्याला नऊ डिसेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे ही आत्महत्त्या आहे की कोणी त्याला जबरदस्तीने गोळ्या खायला लावल्या, हे पोलिस तपासात स्पष्ट होईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.