Chhichhore fame actor accident : 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुशांत सिंग राजपूत स्टारर ‘छिछोरे’ चित्रपटातील आपल्या व्यक्तिरेखेने सर्वांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्याचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. हा अभिनेता अमेरिकेत रस्ता अपघाताचा बळी ठरला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या अपघातात अभिनेत्याला गंभीर दुखापत झाली असून त्याचा खांदाही फ्रॅक्चर झाला आहे.
नवीन पॉलिशेट्टी असं या अभिनेत्याचं नाव असून तो तेलगू इंडस्ट्रीमध्ये देखील सक्रिय आहे. नवीन अभिनयासह लेखक देखील आहे.एका इंटरटेन्मेन्ट चॅनलच्या रिपोर्टनुसार, नवीन पॉलशेट्टी अमेरिकेतील डलासच्या रस्त्यावर बाईक चालवत असताना त्यांच्या मोटरसायकलचा तोल गेला आणि तो पडला. | Chhichhore fame actor accident
पडल्याने त्यांच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या. त्याच्या खांद्याला फ्रॅक्चर झाल्याचाही अहवालात दावा करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्यावर अमेरिकेतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.’छिछोरे’ अभिनेत्याच्या अपघातावर नवीन किंवा त्याच्या टीमकडून सध्या कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. नवीन पॉलिशेट्टी यांनी चित्रपटांसोबतच टेलिव्हिजनमध्येही मोठ्या प्रमाणात काम केले आहे. | Chhichhore fame actor accident
छिछोरे चित्रपटात साकारला होता सुशांतच्या जिगरी मित्राचा रोल
नवीन पॉलिशेट्टी यांनी 2012 मध्ये करिअरला सुरुवात केली. त्याने अनेक हिट तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रमुख अभिनेता म्हणून, नवीनने 2019 मध्ये ‘एजंट साई श्रीनिवास अथरेया’ हा तेलुगू चित्रपट केला, ज्यासाठी त्याला दादासाहेब फाळके पुरस्कार दक्षिणेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला होता.
नवीन पॉलिशेट्टीने तेलगू सिनेमात मुख्य अभिनेता म्हणून काम केले त्याच वर्षी ‘छिछोरे’ या सिनेमातून त्याने हिंदी सिनेमातही एंट्री केली होती. छिछोरेमध्ये त्याने ‘ॲसिड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमांशूची भूमिका साकारली होती. छिछोरेमध्ये, तो सुशांत सिंग राजपूतचा सर्वात चांगला मित्र म्हणून दाखवला होता, जो त्याच्या ‘लूजर’ ग्रुपचा एक भाग होता. | Chhichhore fame actor accident