उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे एका नदीत बस अडकल्याची घटना समोर आली आहे. बिजनौरमधील भागुवालाच्या कोतवाली नदीच्या पाण्यात मुसधार पावसामुळे लक्षणीय वाढ झाली आहे. नदीला पूर आला असताना नजीबाबादहून हरिद्वारला जाणाऱ्या बसच्या चालकाने नदी ओलांडण्याचा निर्णय घेतला. मात्र, रुपाडिया आगाराची बस पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकली.
UP : बिजनौर से हरिद्वार जा रही बस बाढ़ के तेज बहाव में फंसी। बस में करीब 24 यात्री मौजूद। बचाव–राहत कार्य जारी। pic.twitter.com/MHD3dXB9WA
— Anurag Verma ( PATEL ) (@AnuragVerma_SP) July 22, 2023
हरिद्वारला जाणारी रूपडिया डेपोची बस नदीत अडकल्याचे व्हिडिओ आता समोर आले आहे. बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहे. शनिवारी बिजनौरमधील भागुवालाच्या कोतवाली नदीच्या पाण्याची पातळी खूप वाढली. ही नदी तुडुंब भरून वाहत होती. दरम्यान, रुपाडिया डेपोत नजीबाबादहून हरिद्वारकडे जाणारी बस नदीच्या जोरदार प्रवाहात अडकली. बसमध्ये 40 प्रवासी होआरडाओरड केली. बस नदीत अडकल्याने प्रवाशांनी मदतीसाठी सुरुवात केली. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे प्रशासनाला बचाव कार्यात अडचणींचा सामना करावा लागला.
यादरम्यान, वेगवान नदीत बस अडकल्याची माहिती मिळताच प्रशासन सतर्क झाले. पोलिस अधिकारी जेसीबी आणि पोकलेन मशीनसह नदीवर पोहोचले. बसमध्ये उपस्थित असलेल्या प्रवाशांना पोकलेन व जेसीबीच्या सहाय्याने खिडक्यांमधून बाहेर काढून सुखरूप नदीबाहेर काढण्यात आले. नंतर नदीच्या मध्यातून बसही सुखरूप बाहेर काढण्यात आली.