मोनालिसाचे टॉपलेस फोटोशूट

भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीची धडकन असलेली अभिनेत्री मोनालिसाने आपल्या मोहक सौंदर्याने सर्वांची मने जिंकली आहेत. मोनालिसा सतत सोशल मीडियावर आपला जलवा दाखवित असते. त्यातच मोनालिसाने टॉपलेस फोटोशूट केले होते. हे फोटोसूट तिने सोशल मीडियावर शेअर करत तहलका माजविला आहे.

मोनालिसाने बेडरूममध्ये हे टॉपलेस फोटोशूट केले आहे. यात टॉपलेस असलेली मोनालिसाने स्वतःला फुलांच्या गुच्छामागे लपविले आहे. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शन लिहिली की, “सदैव असेच निरखत रहा.’ मोनालिसाच्या या फोटोंवर असंख्य चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास मोनालिसाने आतापर्यत 125 भोजपुरी चित्रपटात काम केले आहे. याशिवाय हिंदी, बंगाली, ओडिया, तमिळ, कन्नड आणि तेलुगू चित्रपटातही आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे.

सध्या मोनालिसा भोजपुरी चित्रपटांपासून काहीसी दुरावलेली असून ती हिंदी टीव्ही सीरियल्समध्ये काम करत आहे. भोजपुरीमध्ये तिने निरहुआ, खेसारी, पवन सिंह आणि रवि किशन यासारख्या आघाडीच्या कलाकारांसोबत काम केलेले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.