द्वेषभावना पसरवल्याबद्दल कंगनाविरोधात गुन्हा

मुंबई, दि. 17 – जातीय तणाव वाढवणारे ट्‌विट केल्याबद्दल सिनेअभिनेत्री कंगना रणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश मुंबईतील न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. कंगना आणि रंगोलीच्या विरोधात कास्टिंग डायरेक्‍टर आहिल आश्रफली सय्यद यांनी तक्रार दाखल झाल्यानंतर बांद्रा महानगर दंडाधिकारी जयदेव वाय. घुले यांनी शुक्रवारी हे अदेश दिले आहेत, अशी माहिती सय्यद यांचे वकील रविश जमीनदार यांनी दिली.

आपल्या ट्‌विटमधून आणि टीव्हीवर दिलेल्या मुलाखतींमधून बॉलीवूडला “वशिलेबाजी’ आणि “पक्षपातीपणाचा अड्डा’ इत्यादी संबोधून कंगना गेल्या दोन महिन्यांपासून बॉलीवूडची बदनामी करत आहे, असा आरोप अय्यद यांनी केला आहे. कंगनाच्या ट्‌विटमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर अनेक कलाकारांच्या भावनाही दुखावल्या गेल्या आहेत. कंगनाची बहीण रंगोली चंदेल हिनेही ओशल मीडियावर जातीय दणाव वाढवणरे वक्‍तव्य केले आहे, असेही सय्यद यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

न्यायालयासमोर सादर केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केल्यानंतर सय्यद यांच्या दाव्यात तथ्य असून कंगना व रंगोली यांनी दखलपात्र गुन्हा केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यानंतर कंगना आणि रंगोलीविरोधात संबंधित कायद्याच्या कलमांखाली आवश्‍यक तपास आणि कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सर्व वक्‍तव्ये ट्‌विटर आणि इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांवरील मुलाखतीत केलेली असल्याने तज्ज्ञांकरवी तपास होणे गरजेचे आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.