नवी दिल्ली – भारताचा दिग्गज फुटबाॅल क्लब मोहन बागान संघाने आय लीग फुटबाॅल स्पर्धेत ऐझवाल एफसी संघाचा 1-0 ने पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह मोहन बागानने स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे.
Mohun Bagan – @ILeagueOfficial Champions 2019-2020.#Champion5 #JoyMohunbagan #DreamBigSupportFearlessly #DreamComesTrue pic.twitter.com/0yWHt6t405
— Mohun Bagan (@Mohun_Bagan) March 10, 2020
मोहन बागान संघाकडून सेनेगलचा स्ट्राइकर बाबा दियावार याने 80 व्या मिनिटाला विजयी गोल नोंदविला. या विजयासह मोहन बागान संघाचे 19 लढतीत 39 गुण झाले असून ते गुणतालिकेत अव्वलस्थानी आहेत.
स्पर्धेत ईस्ट बंगालचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. मोहन बागानचा संघ ईस्ट बंगालच्या 16 गुणांनी पुढे आहे. ईस्ट बंगाल संघाने उर्वरित चारही सामने जिंकले तरी ते मोहन बागान संघास पिछाडीवर टाकू शकणार नाही. त्यामुळे चार लढती शिल्लक असतानाही मोहन बागान संघाने स्पर्धेचे विजेतेपद निश्चित केलं आहे. दरम्यान, मोहन बागान संघाने यापूर्वी 2014-15 मध्ये आयलीग स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं होते.