mohammed shami – न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलच्या सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत मोठा विजय मिळवला आहे. आतापर्यंत वर्ल्डकप 2023 मधील सर्व सामन्यांत टीम इंडियाने विजय मिळवला आहे. न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत टीम इंडियानं फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर टीम इंडियाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
यात विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने केलेल्या शतकांची चांगलीच चर्चा रंगली. त्यासोबतच मोहम्मद शामीच्या (mohammed shami) घातक गोलंदाजीचेही सर्वांनी कौतुक केले आहे. या सामन्यात मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजी करत सात विकेट्स घेतल्या.
शमीच्या गोलंदाजीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप कौतुक केले आहे. तसेच, न्यूझीलंडविरुद्धच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मोहम्मद शमीला (mohammed shami) सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे.
दरम्यान, शमीने वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही खुश झाले आहेत. त्यांनी शमीच्या जन्मगावालाच खास भेट देण्याचा निर्णय घेतला आहेत.
शमीची जन्मगाव असलेल्या सहसपूरमध्ये क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे. शमीचे जन्मगाव सहसपूर अलिनगर हे आहे. हे गाव उत्तर प्रदेशमधील अमरोहा जिल्ह्यात येते.
अमरोहा जिल्हा परिषदेचे सीईओ अश्वानी कुमार यांनी शुक्रवारी सहसपूरला भेट दिली आहे, येथे क्रिकेट स्टेडियम उभारता येईल का याची चाचपणी केली. एका प्रसिद्धीवृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.
शमीचे कुटुंब या गावातच राहाते, शमीही बऱ्याच वेळा घरी येत असतो आणि म्हणूनच आता यागावात क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या युवा मंत्रायलाच्या निधीतून या गावात स्टेडियम उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.