Narendra Modi – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१२ जानेवारी) आज अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी एक ऑडिओ मेसेज शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी 11 दिवसांचा विशेष विधी सुरू करत असल्याचे सांगितले आहे. या शुभ सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य आहे. असेही मोदी म्हणाले आहे. अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराचा अभिषेक 22 जानेवारीला होणार आहे. आता यात फक्त 11 दिवस उरले आहेत. प्राणप्रतिष्ठेची अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे.
पीएम मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकसाठी केवळ 11 दिवस उरले आहेत. या शुभ सोहळ्याचा मी देखील साक्षीदार होणार हे माझे भाग्य आहे. परमेश्वराने मला या प्रसंगी भारतातील सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक साधन बनवले आहे. हे लक्षात घेऊन मी आजपासून 11 दिवसांचा विशेष विधी सुरू करत आहे. मी सर्व लोकांकडून आशीर्वाद मागत आहे. अशावेळी माझ्या भावना शब्दात मांडणे खूप अवघड आहे, पण मी माझ्या बाजूने प्रयत्न केला आहे.
देशातील प्रत्येकजण 22 जानेवारीची वाट पाहत आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ऑडिओ संदेशात म्हटले आहे की, ‘आयुष्यातील काही क्षण दैवी आशीर्वादामुळेच वास्तवात बदलतात. आजचा दिवस जगभरातील भारतीयांसाठी एक पवित्र पर्व आहे. सर्वत्र भगवान श्री राम भक्तीचे अद्भुत वातावरण आहे. ते म्हणाले, ‘देशातील प्रत्येकजण 22 जानेवारीची वाट पाहत आहे आणि आता अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकसाठी केवळ 11 दिवस उरले आहेत. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशा भावनांमधून जात आहे. भक्तीची एक वेगळी अनुभूती मी अनुभवत आहे.