जनतेच्या विश्‍वासाने देशात पुन्हा मोदीपर्व सुरू : डॉ. अतुल भोसले

भारतातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्‍वास ठेऊन देश पुन्हा एकदा सुरक्षित हातांमध्ये सोपविला आहे. नरेंद्र मोदी यांनी गेल्या 5 वर्षांत भारतातील सामान्य नागरिकांच्या प्रगतीसाठी आखलेली ध्येयधोरणे आणि देशाच्या विकासासाठी व सुरक्षिततेसाठी घेतलेले धाडसी निर्णय यामुळेच भारतीय जनतेने भाजपाला भरभरून पाठबळ दिले आहे.

जनतेने भाजपावर दाखविलेल्या या विश्‍वासामुळेच देशात पुन्हा एकदा मोदीपर्व सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील जनतेनेही भाजप-शिवसेना युतीवर भरघोस विश्‍वास दाखवित, विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पानिपत केले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाची ही विजयी घोडदौड कायम राहिल, याची मला खात्री आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.