येत्या २३ तारखेला मोदी पुन्हा सत्तेवर येतील- रामदास आठवले

पुणे: भाजपावर जातीयवादी पक्ष म्हणून केले जाणारे आरोप खोटे आहेत. पंतप्रधान मोदी हे भ्रष्टाचारा विरुद्ध आहेत. त्यामुळे येत्या २३ तारखेला पुन्हा मोदी सत्तेवर येतील असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. आठवले यांनी गिरीश बापट यांच्या समर्थनासाठी पत्रकार परिषद घेतली.

दरम्यान, गिरीश बापट म्हणाले, भाजप-सेना-आरपीआय महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून पुण्यातून मी निवडणूक लढवत आहे. शहरातील आंबेडकरी चळवळीतील अनेक संघटनांनी मला पाठिंबा दिला आहे. यामध्ये लोकजनशक्ती पार्टी, दलित पँथर, लहुजी सेना, रिपाइंच्या विविध गटांचा मला पाठिंबा आहे.

याशिवाय वडार, कोळी, भोई समाजाने मला भेटून पाठिंबा व्यक्त केला आहे. वर्षानुवर्षे काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांसोबत राहून दलित समाजाचा भ्रमनिरास झाला आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर या समाजासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत. दिल्लीपासून सर्व ठिकाणी या समाजाला सत्तेत सामावून घेतले आहे. माझ्या उमेदवारीला या सर्वांचा पाठिंबा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.