लैला मजनूपेक्षा मोदी-नितीशकुमार यांचे एकमेकांवर जास्त प्रेम – असदुद्दीन ओवेसी

पाटना – एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. यांचे प्रेम इतिहासातील अजरामर जोडी लैला-मजनू यांच्यापेक्षाही जास्त आहे, असा टोला लगावित ओवेसी यांनी मोदी आणि नितीश कुमार यांच्यात झालेल्या युतीवर टीका केली आहे.

ओवेसी म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार या दोघांमध्ये खूप प्रेम आहे. यांचे प्रेम लैला-मजनूहूनही खूप जास्त आहे. नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांची प्रेमकहाणी लिहिली जाईल तेव्हा त्यांच्यातील लैला कोण आणि मजनू कोण? हे मला विचारु नका, ते तुम्हीच ठरवा.

ओवेसी एवढ्यावरच थांबले नाहीत, ओवेसी लैला आणि मजनूला उद्देशून म्हणाले की, लैला आणि मजनू ऐका, तुमची प्रेम कहाणी लिहिली जाईल तेव्हा त्यामध्ये प्रेमाऐवजी केवळ द्वेष लिहिला जाईल. जेव्हापासून दोघे एकत्र आले तेव्हापासून भारतात हिंदू आणि मुस्लिमांममध्ये तणाव निर्माण झाला, असे या प्रेम कहाणीत लिहिले जाईल.
यावेळी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्यावरही त्यांनी टीका केली. मनेका गांधी मुस्लिमांना तुम्ही आम्हाला मत दिले नाहीत तर नोकऱ्या मिळणार नाही, अशी धमकी देतात. पंतप्रधानांनी दिलेली “सबका साथ, सबका विकास’ची घोषणा हे पूर्ण खोटी आहे, असे आवेसी म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.