आताच सावध व्हा! फार वेळ मोबाईलवर घालवू नका नाहीतर…

रोज एवढा वेळ जर मोबाईलवर घालवत असाल तर या समस्यांना तोंड द्यावे लागणार!

मुंबई- लाॅकडाऊनच्या काळात अनेक व्यवहार घरुन सुरु आहे तर अनेकजण आपला वेळ घालवण्यासाठी मोबाईचा वापर करताना दिसत आहेत. लहान  मुलांच्या शाळा देखील आॅनलाईन सुरु झाल्या आहेेत. त्यामुळे त्या मुलांचं देखील मोबाईलवर राहण्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. त्यातच काही सर्वेक्षणातून असं लक्षात आलं आहे की 40 वर्षांवरील लोक जास्त वेळ मोबाईलवर घालवतात. मात्र जर तुम्ही जास्त मोबाईवर वेऴ घालवत असाल तर तुम्हाला भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अति प्रमाणात मोबाईल वापरण्याचे दुष्परिणाम कोणते आहे?  जाणून घ्या

 

1.पाच तासंपेक्षा जास्त वेळ जर तुम्ही मोबाईलचा वापर केला तर तुमच्या डोळ्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. डोळ्यांच्या रेटीनावर स्क्रीनच्या लाईटचा परिणाम होतो. त्यामुळे रेटीनाचा आकार लहान होवू शकतो.

2. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे शारीरिक हालचाल मंदावते. परिणामी स्थूलता वाढते.

3.स्थूलतेसोबतच हृदयाशी संबंधित आजार जडण्याची शक्यताही वाढते.

4. मधुमेह, हृदयविकार, विविध प्रकारचे कर्करोग, अपमृत्यू होण्याची शक्यता वाढत असल्याचंही संशोधनात समोर आलं आहे.

5.पाच तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ स्मार्टफोन वापरल्याने स्थूल होण्याची शक्यता 43 टक्क्यांनी बळावते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.