मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज मुंबईत दाखल झाले आहेत. याप्रसंगी मुंबई विमानतळावर हजारो शिवसैनिकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत जंगी स्वागत करण्यात आले. ईडीने केलेल्या कारवाईनंतर संजय राऊत मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर ढोल-ताशाच्या गर्जरही करण्यात आला.
या स्वागतावेळी शिवसैनिकांसह शिवसेनेचे आमदार सुनील राऊत, सुनील प्रभू आणि खासदार विनायक राऊत हे देखील उपस्थित होते. योद्धा नावांच्या फलकांसह राऊतांच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली. संजय राऊतांच्या फोटोसह पोस्टरबाजी करताना शिवसैनिक दिसून आले. विमानतळ ते भांडुप रॅली काढून शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत राऊतांना टोला लगावला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत संजय राऊत यांना टोला लगावला आहे की,’स्वतःवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले,11 कोटीची संपत्ती जप्त झाली म्हणून ढोल ताशे वाजवत मिरवणूक काढणारे येड xx पहिल्यांदा बघितले’
मनसे नेते संदीप देशपांडे यांचे ट्विट
स्वतःवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले,11 कोटीची संपत्ती जप्त झाली म्हणून ढोल ताशे वाजवत मिरवणूक काढणारे येड xx पहिल्यांदा बघितले
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 8, 2022