मुंबई – मनसे नेते वसंत मोरे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. महाराष्ट्रातील राजकारण असो वा पुण्यातील एखादा विषय वसंत मोरे सोशल मीडियावरून नेहमीच व्यक्त होता असतात. आता देखील मोरे यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्ट मध्ये वसंत मोरे यांनी त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी आलेल्यांबाबत भाष्य केले आहे.
वसंत मोरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात,”कधी कधी मी निरपेक्ष पणे वर्णभेद, जात-पात, श्रीमंतगरीब हा कोणताही फरक न पाहता सर्वसामान्य जनतेची कामे करतो तेव्हा खुप समाधान वाटते.पुण्याच्या विविध भागातून लोक माझ्याकडे समस्या घेवून येतात मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो कधी कधी तर काही प्रभागात मुस्लिम नगरसेवक असतानाही तिकडचे मुस्लिम बंधू भगिनी माझ्याकडे येतात” अशी माहिती मोरे यांनी आपल्या पोस्टद्वारे दिली आहे.
वसंत मोरे पुढे म्हणतात,”मी त्यांना सहजच विचारतो आरे भाभी तुम्हारे यहाँ भी नगरसेवक है वो काम नही करते क्या ? तेव्हा आपसूक त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर येतात आप हमे बडे भाई के माफिक लगते हो आणि मग मनात एक विचार येतो जर यांना माझ्या कपाळावरील भगव्याची अडचण नाही तर मला बुरखा आणि टोपीची अडचण का असावी ???”
या पोस्टसह वसंत मोरे यांनी काही फोटो देखील शेअर केले आहेत. ज्यामध्ये काही मुस्लिम महिला आणि बांधव त्यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. जाती पतीची तमा न बाळगता वसंत मोरे अनेकांची काम करत असतात हे या पोस्टवरून समोर येते. मोरेंनी ही पोस्ट सोशल मीडियावर करताच अनेकांनी शेअर केली आहे. कार्यकर्त्यांसह नेटकऱ्यांनी देखील वसंत मोरे यांचे त्यांनी केलेल्या कामासाठी कौतुक केले आहे.