सध्या कोरोनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी करण्यात येतोय

मनसे नेते संदीप देशपांडे यांची राज्यसरकारवर टीका

मुंबई  :- ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून  राज्यात 22 डिसेंबरपासून 5 जानेवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी (नाईट कर्फ्यू अर्थात रात्रीची संचारबंदी) लागू करण्याचा निर्णय घेतला. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधत टीका केलीये.

यासंदर्भात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरुन राज्य सरकारवर टीका केलीये.  त्यांनी म्हटले आहे की, ‘सध्या कोरोना चा वापर हा राजकीय स्वार्था साठी करण्यात येत आहे. या बद्दल आपण सगळ्यांनी जागरूक असलं पाहिजे”म्हातारी मेल्याच दुःख नाही काळ सोकावतोय.”

याआधीही मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यसरकारवर कोरोनासंदर्भातील निर्णयावरून अनेकदा टीका केली आहे. कालच (24 डिसेंबर) संदीप देशपांडे यांनी एक फोटो शेअर करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीत सहभागी झाल्याबदल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर ट्विट करत टीका केली आहे.

मुंबईकर नव्हे, पण हा करोना.. खूप डॅम्बिस आहे….

संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “शरद पवार साहेबांचा वाढदिवस महालक्ष्मी रेसकोर्स येथे नुकताच साजरा झाला. त्या पार्टीला अदानी-अंबानी यांच्यासह मुख्यमंत्री सुद्धा सहकुटुंब उपस्थित होते, कोरोना तिथे फिरकला सुद्धा नाही. मात्र सामान्य जनतेच्या पार्ट्यांमध्ये तो हमखास येतो. मुंबईकर नव्हे, पण हा कोरोना.. खूप डॅम्बिस आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.