मनसे दणका! मराठी अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यास सांगणाऱ्या उत्तर प्रदेशच्या चार निर्मात्यांना चोपलं

मुंबई – मुलींना चित्रपटामध्ये रोल देतो असं सांगून त्यांचा गैरफायदा घेणाऱ्या परप्रांतीयांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी ठाण्यातील घोडबंदर येथे चांगलाच चोप दिला.  उत्तरप्रदेश च्या या निर्मात्यांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कपडे फाटेस्तोर चोपलं आहे.

 

या घटनेचा सविस्तर व्हिडियो  चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुक लाईव्ह करत या प्रकरणाची माहिती दिली आहे. त्या या पोस्टमध्ये लिहिले आहे की,’मनसे दणका! मुलींना चित्रपटा मध्ये रोल देण्याचे आमीश दाखवून गैर फायदा घेणारे हे ‘उपरे’ आणि शिवसेना चित्रपट सेनेचा पदाधिकारी यांना मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष श्री पदमनाथ राणे यांनी मनसे दणका दिला.’ 

 

 

 

 

काय म्हणाले अमेय खोपकर

‘चित्रपटसृष्टीत सध्या परप्रांतीय गुंडांचा सुळसुळाट झालेला आहे. आपल्याच राज्यातल्या नेत्यांचा राजकीय वरदहस्त असलेल्या या गुंडांकडून माझ्या महाराष्ट्रातल्या माय-भगिनींना ‘कास्टींग काऊच’चा सामनाही करावा लागतोय. हे अतिशय दुर्दैवी आहे. पण राजसाहेबांच्या तालमीत तयार झालेले आम्ही महाराष्ट्र सैनिक अशा गुंडांची गय करणार नाही. मनोरंजन क्षेत्रात आपलं करिअर घडवण्याच्या उद्देशाने संघर्ष करत असलेल्या माय-भगिनींना आमचा शब्द आहे की पुन्हा तुमच्याबरोबर असा गलिच्छ प्रकार होऊ देणार नाही. या परप्रांतियांना आज तर आम्ही चांगलाच चोप दिलाय आणि पोलिसांच्या स्वाधीनही केलंय, पण असेच बरेच लिंगपिसाट मोकाट फिरतायत, त्यांच्या आमिषाला बळी पडू नका. त्वरित महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेशी संपर्क साधा. तुमचं संरक्षण करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र सैनिक सदैव तत्पर आहोत.’

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.