मुंबई – ‘शेती विकायची नसते… ती राखायची असते’ असा संदेश आपल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून देणारे अभिनेते, लेखक, दिग्दर्शक ‘प्रविण विठ्ठल तरडे’ यांची नाळ आजही आपल्या मातीशी जोडली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.
नुकतंच प्रवीण तरडे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून, यामध्ये प्रवीण शेतात भट लावणी करताना दिसू येत आहे. प्रवीण तरडे आपल्या व्हिडिओ मध्ये म्हणतात कि,
“भात लावणी.. ईन्द्रायणी तांदुळ मुळशीची खास ओळख .. ईथली कामं संपली की थेट मदतीला कोकणात जाणार आहे.” यावेळी तरडे यांनी फेसबुकद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधला.