वाघोली (पुणे) – वाडेबोल्हाई (ता. हवेली) प्राथमिक आरोग्य केंद्राला कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन येथील आरोग्य सेवा व कामकाजाची भेट देऊन पाहणी केली.
यावेळी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे, हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप, ऋषीराज अशोक पवार, गणेश सातव, डॉ.सूर्यवंशी, आरोग्य कर्मचारी व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.